लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
सडक अर्जुनी, दि. २२ जुलै : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष, सडक अर्जुनी तालुक्याच्या वतीने आज २२ जुलै रोजी तेजस्विनी लॉन, सडक अर्जुनी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
समाजहिताच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक युवक, महिला तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला डॉ. भूमेश्वरजी पटले (जि.प. सदस्य), कविताताई रंगारी (जि.प. सदस्य), चेतनजी वडगाये (सभापती, पंचायत समिती), तेजरामजी मडावी (नगराध्यक्ष, नगर परिषद), सुधाताई रहांगडाले (जि.प. सदस्य), डॉ. अविनाशजी काशिवार (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), राजेशजी कठाने (मंडळ अध्यक्ष, भाजपा), विलासजी बागडकर, शिवाजीजी गहाणे (पं.स. सदस्य), सपनाताई नाईक (पं.स. सदस्य), विश्वनाथजी रहांगडाले (उपसभापती, कृ.उ.बा.स.), वंदनाताई डोंगरवार (उपाध्यक्ष, नगर परिषद), रमेशजी चुऱ्हे (माजी जि.प. सदस्य), प्रशांतजी शहारे (जिल्हा महामंत्री, भाजपा), निशाताई तोडासे (जि.प. सदस्य), दिक्षाताई भगत (नगरसेविका), देवाजी बनकर, डॉ. कोरेजी, आनंदजी अग्रवाल (नगरसेवक), छायाताई चौहान (माजी जि.प. सदस्य), शिलाताई चौहान (माजी पं.स. सदस्य), अल्लाउद्दीन राजानी (सदस्य, पंचायत समिती), रंजनाताई भोई (महिलाध्यक्ष, सौंदड मंडळ भाजपा), शीतलताई गौर (महिलाध्यक्ष, अर्जुनी मंडळ भाजपा) यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून त्यातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व रक्तदाते, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
