आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डूग्गीपार पोलिसांचा रूट मार्च
डॉ. सुशिल लाडे..
सडक अर्जुनी : आगामी सण-उत्सव पोळा, मार्बद,आणि गणेश उत्सव शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पडावेत तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने डूग्गीपार पोलिस स्टेशनच्या वतीने आज, दि. 10 सप्टेंबर रोजी सडक अर्जुनी शहरात रूट मार्च काढण्यात आला.

रूट मार्चची सुरुवात तहसील कार्यालय परिसरातून करण्यात आली. त्यानंतर दुर्गा चौक, मस्जिद परिसर , हनुमान मंदिर ( गुजरी चौक), शिव मंदिर , मेन रोड मार्गे पुन्हा तहसील कार्यालय परिसरात रूट मार्चची सांगता करण्यात आली.

