MKM NEWS 24 च्या बातमीचा दणका; अखेर कुजलेल्या सिमेंटच्या बोऱ्या हटवल्या!
सुशिल लाडे..
•घाटबोरी तेलीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची दखल
सडक अर्जुनी- घाटबोरी तेली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील वर्गखोलीच्या दरवाजालगत तब्बल वर्षभरापासून ठेवण्यात आलेल्या कुजलेल्या सिमेंटच्या बोऱ्यांबाबत MKM NEWS 24 ने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत सविस्तर बातमी शनिवार १९ सप्टेंबर २६ रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची अखेर एका दिवसात दखल घेण्यात आली असून, वर्गखोलीला लागून ठेवलेल्या सिमेंटच्या बोऱ्या रविवार ला २० सप्हटेंबर रोजी हटविण्यात आल्या आहेत. 
पूर्वीची फोटो आणि बातमीचा परिणाम
या प्रकाराची छायाचित्रे व व्हिडिओ उपलब्ध करून MKM NEWS 24 ने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न ठळकपणे मांडला. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने याची दखल घेत अखेर या सिमेंटच्या बोऱ्या हटविल्या.
बातमीचा परिणाम; विद्यार्थ्यांना दिलासा
शाळेच्या परिसरातील संभाव्य त्रासदायक वस्तू हटविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. केवळ समस्या मांडणे नव्हे, तर त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही होणे हीच पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेची खरी फलश्रुती असल्याचे या घटनेतून दिसून आले.


दरम्यान, शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू साठविल्या जाणार नाहीत, याची नियमित पाहणी करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

MKM NEWS 24 च्या बातमीची दखल घेत विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लागल्याने पालक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
