साहेब मुरूम चोरीचा पंचनामा केल्या, पण कारवाईचे काय झाले? ; नागरिकांचा प्रशासनावर दडपशाहीचा आरोप
सुशिल लाडे….
सडक अर्जुनी -दि. 24 एप्रिल 2026 – नगरपंचायत सडक अर्जुनी चा ताबा असलेल्या गट क्रमांक १८९/२ जागेवर अर्थात घन कचरा व्यवस्थापन केंद्रा ला लागून असलेल्या पहाडी वर अवैध रित्या मुरूम खनन चोरी करताना gps फोटो सोबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. प्रकाशित झालेल्या बातम्या च्या आधारे महसूल विभागाने पंचनामे करिता तलाठी यांना पाठवले. सडक अर्जुनी चे मंडळ अधिकारी वैशाली साबळे आणि ग्राम महसूल अधिकारी हर्षकुमार उईके यांनी १७ एप्रिल रोजी पंचनामा सुद्धा केला आहे.


परंतु पंचनाम्यात 60 ते 70 ब्रासच अवैध मुरूम खनन झाले आहे नमूद आहे. जेवढे ब्रास मुरूम खनन झाले त्या नुसार ट्रॅक्टर वाहन मालकाकडून दंड वसूल करण्यात येणार, ट्रक्टर ट्रॉली क्रमांक MH35 AG 9351 असे असून वाहन मालक कोण आहे हे RTO कार्यालया कडून माहिती आल्यानंतरच कळेल त्या नंतर समोरची कारवाही केल्या जाहिल असे तहसीलदार आनंद जाधव म्हणाले.
प्रमुख म्हणजे,
१४ एप्रिल रोजी घडलेल्या मुरूम चोरीच्या घटनेवर प्रशासनाने पंचनामा तर केला, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “पंचनामा करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर नाही ना?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 
उपलब्ध माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे. मात्र, इतक्या गंभीर प्रकारानंतरही दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “जर एवढ्या प्रमाणात मुरूम चोरी झाली असेल, तर जबाबदारांवर गुन्हा दाखल का केला गेला नाही? संबंधित वाहनांवर किंवा व्यक्तींवर कारवाई का झाली नाही?” या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
विशेष म्हणजे, पंचनाम्यात अनेक बाबींची नोंद असूनही, पुढील प्रक्रिया थांबलेली दिसत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात काहीतरी दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
⚠️ नागरिकांचे सवाल:
• नगरपंचायत च्या मालकीच्या जागेतून मुरूम चोरी झाली नगरपंचायत ने काय पाऊल उचलले? कोणती कारवाही केली? नगरपंचायत आणि मुरूमचोर यांचे संगनमत तर नाही ना??
• संपूर्ण सडक अर्जुनी शहर च CCTV कॅमेरे च्या निगराणीत आहे तरी सुद्धा रात्रंदिवस अवैध रेती,मुरूम चोरी चे ट्रॅक्टर, वाहन दिसत नाही का?
•महसूल विभागाने पंचनामा केला खरं, मग कारवाई का नाही?
•कारवाही साठी एवढी दिरंगाई कशी?
•प्रशासन नेमकं कोणाला वाचवत आहे?
•प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही ना?
निष्कर्ष:
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या मुरूम चोरीसारख्या गंभीर प्रकरणात केवळ पंचनामा करून थांबणे योग्य नाही. या प्रकरणात पारदर्शकता ठेवून दोषींवर नियमा प्रमाणे कारवाई करण्यात यावी, जेणे करून मुरूम चोरी करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांचे संपूर्ण लक्ष ट्रॅक्टर मालक कोण आहे, किती दंड होते आणि महसूल विभाग काय कारवाही करते याकडे लागले आहे.
