नवलच ! तहसील कार्यालयातूनच डंपरची बॅटरी चोरी; शासकीय कार्यालयाच्या आवारातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सुशिल लाडे…..
सडक अर्जुनी १३/५/२६ : तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारातूनच एका मालवाहू डंपरची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कार्यालय परिसरातच चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, सडक अर्जुनी तहसील कार्यालय परिसरातून सुरेश देवराज कावळे मू.ब्राह्मणी ,तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांच्या एका मालवाहू डंपरची ( वाहन क्रमांक MH 35 AJ 6767) दोन बॅटरी चोरी झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी डूग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शासकीय कार्यालय परिसरातच चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सुरेश देवराज कावळे, रा. ब्राह्मणी , ता. गोरेगाव, जि. गोंदिया यांची MH 35 AJ 6767 क्रमांकाची मालवाहू गाडी अवैध रित्या रेती वाहतूक करताना सडक अर्जुनी महसूल विभाग मार्फत जप्त करून गाडी तहसील कार्यालय जमा करण्यात आली.
गाडी मालकाने सांगितल्या प्रमाणे गाडीचे फाइन भरण्याकरिता आज दिनांक १३ मे २०२६ रोजी तहसील कार्यालयात आले असता त्यांनी गाडी बघण्याकरिता गाडी जवळ गेले असता त्यातील मोठ्या दोन बॅटरी अंदाजे किंमत ४५,००० हजार रुपये असून (लंपास) चोरी झाल्याचे त्यांना समजले. याबाबद तक्रार करत्याने तहसीलदार यांना सांगितले असता त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा असे सांगितले. आणि तहसील कार्यालया मार्फत सुद्धा आम्ही बॅटरी चोरीची तक्रार दाखल करू असे तहसीलदार यांनी म्हटले असल्याचे सांगितले. 
महत्त्वाचे म्हणजे, सदर वाहनाची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असता फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित वाहन ३ मे २०२६ रोजी सडक अर्जुनी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. आज १३ मे २०२६ रोजी वाहन पाहण्यासाठी गेले असता गाडीची बॅटरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र बॅटरी मिळून आली नाही.
या घटनेची माहिती डूग्गीपार पोलीस स्टेशनला देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विशेष बाब :-
तहसील कार्यालय परिसरात उभ्या असलेल्या डंपर मधील महागडी बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली. आज वाहन चालकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 
शासकीय कार्यालयाच्या आवारातच चोरी होत असल्याने तहसील कार्यालयाच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या बाबत गाडी मालकाने संताप व्यक्त केला आहे की, परिसरात रात्री सुरक्षारक्षक CCTV कॅमेरे असूनही बॅटरी चोरी कशी झाली,? कदाचित स्टेपनि टायर ,किंवा ट्रॅकच चोरी झाला असता तर…?! असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली असून डूग्गीपार पोलीस विभाग तपास करीत आहे.
दरम्यान, तहसील कार्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

