Monday, June 22, 2026
गोंदियाभंडारा

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक 2026 : अविनाश ब्राह्मणकर यांचा दणदणीत विजय

भंडारा प्रतिनिधी – २२ जून २०२६ – .भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत एकूण 457 वैध मते पडली असून 1 मत अवैध ठरले. महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना 302 मते मिळाली, तर महाविकास आघाडी समर्थित उमेदवार नरेश इश्वरकर यांना 154 मते मिळाली. अपक्ष उमेदवार सचिन कुंभलकर यांना कोणतेही मत मिळाले नाही.

विजय उमेदवार अविनाश ब्राह्मणकर 

अविनाश ब्राह्मणकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 148 मतांच्या फरकाने विजय मिळवत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला आहे. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.

निकाल एका नजरेत :

एकूण वैध मते : 457

अवैध मते : 1

अविनाश ब्राह्मणकर (महायुती) : 302

नरेश इश्वरकर (महाविकास आघाडी समर्थित) : 154

विजयाचा फरक : 148 मते

error: Content is protected !!