सौंदडमध्ये गांजाचा साठा उघड!, डुग्गीपार पोलिसांची घरावर धाड; 2 किलो 630 ग्रॅम गांजा जप्त
सडक अर्जुनी :डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत सौंदड येथील शास्त्री वॉर्डमध्ये एका घरातून 2 किलो 630 ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त गांजाची किंमत तब्बल 1 लाख 31 हजार 500 रुपये असल्याची माहिती आहे.
28 सप्टेंबर 2026 रोजी रात्री पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शास्त्री वॉर्ड येथील विदेश संपत बडोले (वय 36 वर्षे) यांच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान गांजा आढळून आल्याने पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला. 
या प्रकरणात संबंधित व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अमली पदार्थांविरोधात पोलिसांची कडक नजर
सौंदड परिसरात गांजासारख्या अमली पदार्थांची विक्री किंवा साठवणूक होत असल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली जात असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.
