Monday, October 5, 2026
सड़क अर्जुनी

दिलदार व्यक्तिमत्त्वाचे धनी नसीम भाई काळाच्या पडद्याआड; सडक अर्जुनीत शोककळा

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी येथील दिलदार व्यक्तिमत्त्व, मनमिळाऊ स्वभाव आणि सामाजिक कार्याची तळमळ असलेले नसीम भाई यांचे आज, रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सडक अर्जुनी परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नसीम भाई हे सडक अर्जुनीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच मंडई आयोजनाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या कामांसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि दिलदार व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी समाजातील विविध घटकांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण केले होते.

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणाऱ्या नसीम भाई यांच्या अचानक जाण्याने सडक अर्जुनीने एक मनमिळाऊ आणि लोकांसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या निधनाने मित्रपरिवार, आप्तस्वकीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त होत आहे.

अंत्यसंस्कार 5 ऑक्टोबर सकाळी 10-30 वाजे

नसीम भाई यांचा अंत्यसंस्कार उद्या, सोमवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी वेळ 10.30 वाजे सकाळी सडक अर्जुनी येथील मुस्लिम कब्रस्तानात करण्यात येणार आहे.

दिलदार व्यक्तिमत्त्वाच्या या सामाजिक कार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली!

error: Content is protected !!