Wednesday, April 29, 2026
सड़क अर्जुनी

शिवसेना तालुका सडक अर्जुनी द्वारे शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

सडक अर्जुनी MKM NEWS 24 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त (तिथी प्रमाणे शिवजयंती) ६ मार्च रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील गोपाळतोली येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने उत्सव साजरा केला.
शिवसेना (ऊ.बा.ठा) तालुका सडक अर्जुनी यांच्या वतीने ग्राम गोपाळटोली येथे आयोजित या भव्य शिवजयंती उत्सव सोहळ्यात स्थानिक शिवभक्त, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या भव्य दिव्ये कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोंदिया राजुभाऊ पटले ,तालुका प्रमुख मनोज रामटेके, तालुका महिला आघाडी प्रमुख मुंगुलमारे ताई, विभागप्रमुख बाळबुद्धेजी, तालुका संघटक विशाल उजवने, युवासेना जिल्हा समन्वयक कार्तिक पटले, युवासेना उपजिल्हाप्रमुख युवराज गौतम आणि अनेक शिवसेने कार्यकर्ते ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि पुष्पहार अर्पणाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले.

“जय भवानी, जय शिवाजी!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन-कीर्तन, शिवचरित्रावर आधारित नाट्य सादरीकरण आणि विद्यार्थ्यांच्या स्पर्धा यांचा समावेश होता. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आदर्श, स्वराज्याची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील योगदान यावर भाषणे केली. “शिवरायांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या मार्गाने चालत महाराष्ट्राला मजबूत करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू भाऊ पटले यांनी सांगितले.
या सोहळ्यात स्थानिक ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

error: Content is protected !!